औरंगाबाद हादरले! खर्चाचा हिशोब मागितला म्हणून मुलाकडून आई-वडिलांची गळा चिरून हत्या
Updated On:

औरंगाबाद – मुलाने जन्मदात्या आई-वडिलांची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद येथे घडली आहे. किरण कलंत्री आणि शामसुंदर कलंत्री अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. तर देवेंद्र शामसुंदर कलंत्री असे हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
देवेंद्र हा घरच्या दुकानातील पैसे घेऊन खर्च करत असे. आई-वडील त्याला खर्च केलेल्या पैशांचा हिशोब मागत असत. मौजमजेसाठी जास्त पैसे खर्च करत असल्याने त्यांनी देवेंद्रला फटकारले होते. याचाच राग मनात धरून त्याने आई-वडिलांची हत्या केली असल्याचे उघडकीस आले. आरोपी देवेंद्र कलंत्री याला औरंगाबाद पोलिसांनी शिर्डीतून अटक केली आहे. पुढील तपास औरंगाबाद पोलीस करत आहेत.





