औरंगाबाद: वऱ्हाडाच्या वाहनाला भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू तर 22 जण गंभीर जखमी

औरंगाबाद : औरंगाबादच्या वैजापूरजवळ भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन आयशर ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यातील एक गाडीत लग्नाचे वऱ्हाड होते. अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 22 जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे.
अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णलयाल हलवण्यात आलं आहे. काही जखमींना औरंगाबाद तर काहींना नाशिकला हलवल्याची माहिती मिळाली आहे. पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील औरंगाबाद लासूर रोडवरील हा भीषण अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वाहनातून वऱ्हाडी औरंगाबाद वरून नाशिककडे लग्न समारंभासाठी निघाले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन्ही आयशरमध्ये हा अपघात झाला आहे. अपघातात 22 जण जखमी तर 4 जण जागीच मृत्यूमुखी झाल्याची माहिती वैजापूर पोलिसांनी दिली आहे.
जखमींपैकी 4 जणांवर औरंगाबादमध्ये उपचार सुरू आहेत तर बाकी जखमींना नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.





