मुंबई – बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट 30 मार्च 2023 रोजी सिनेमागृहात रिलीज झाला. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भोला’ने बॉक्स ऑफिसवर 11.20 कोटींची कमाई केली होती. तर मात्र दुसऱ्या दिवशी फारशी कमाल दाखवू शकला नाही.
‘भोला’ने दुसऱ्या दिवशी 7.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानुसार ‘भोला’चे नेट इंडिया कलेक्शन दोन दिवसांत 18.6 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अजय देवगणच्या भोला चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा देखील अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे अजयच्या भोला चित्रपटाकडे प्रेक्षक पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे.
‘भोला’ जवळपास 4000 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. यानुसार, चित्रपटाचे कलेक्शन खूप कमी झाल्याचे दिसते. मात्र विकेंडला चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकेल, असा अंदाज आहे. दरम्यान, अजय देवगणचा भोला चित्रपटात वेगळा लूक पाहायला मिळाला आहे.
हा चित्रपट अजयचा आतापर्यंतचा सर्वात साहसी चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. ही एका माणसाच्या सैन्याची कहाणी आहे, जी वेगवेगळ्या वेशात मानव आणि इतर शत्रूंच्या सैन्याशी लढते. यामध्ये अजयसोबत अभिनेत्री तब्बू देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.