Automotive Industry : आगामी काळात ऑडी इंडियाची विक्री वाढण्याची अपेक्षा – बलबीर सिंग धिल्लन

नवी दिल्ली – लक्झरी कार उत्पादक ऑडी इंडियाची विक्री गेल्या काही महिन्यापासून मंदावली आहे. जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यामुळे कंपनीच्या उत्पादन व विक्रीवर परिणाम झाला आहे. मात्र आगामी काळात ही विक्री 8 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे असे या कंपनीचे भारतातील प्रमुख बलबीर सिंग धिल्लन यांनी सांगितले.
कंपनीची एसयूव्ही क्यू 7 भारतात सादर केल्यानंतर पत्रकारांश बोलताना ते म्हणाले की, “जागतिक व्यापारावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे गेल्या दोन तिमाहीत पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे.
Automobile Industry : मारुती सुझुकीने केली 30 लाख कारची निर्यात…
आता पुढील वर्षात लक्झरी कारची विक्री आठ ते दहा टक्क्यांनी वाढेल आणि ऑडी इंडिया कंपनीची विक्री त्याच प्रमाणात वाढेल. जानेवारी- सप्टेंबर या कालावधीत या कंपनीची विक्री केवळ पाच टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत विक्री 30 टक्क्यांनी वाढली होती.



