– हेमंत महाजन केवळ मागील एकाच आठवड्यात घडलेल्या काही घटनांमुळेही भारतावर भविष्यात काय काय परिणाम होऊ शकतात, याबाबत केलेले विचारमंथन. आर्थिक सुरक्षा-यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांच्या बाबतीत भारत संपूर्ण जगात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. भारतातील डिजिटल व्यवहार 89.5 दशलक्ष झाले आहेत. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत आता या चार देशांचे आकडे एकत्र केले तरी भारत खूप पुढे आहे. अमरनाथ यात्रेमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील बालटाल आणि पहलगाम या दोन मार्गांनी यात्रेकरू प्रवास करतात. आता सर्व यात्रेकरूंना आरएफआयडी कार्ड दिले जातील, जेणेकरून त्यांचे रिअल टाइम लोकेशन ट्रेस केले जाईल आणि सर्वांना 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल. यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या प्रत्येक जनावरांसाठी 50 हजार रुपयांचे विमा संरक्षण असेल. एटीएसने गुजरात येथील पोरबंदर येथून एका परदेशी नागरिकासह चार जणांना अटक केली आहे. या लोकांचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध आहे. काश्मिरात आयएसआयकडून महिला, मुलांच्या हातून शस्त्रपुरवठा; दहशतवाद्यांना संदेश देण्यासाठी मुलींचा वापर केला जात आहे, जो थांबवला पाहिजे. भारतीय वायुदलाचा लष्करासोबत संयुक्त सराव; पॅरा कमांडोंच्या आकाशातून उड्या, रॉकेट लॉंचरसह अपाचे हेलिकॉप्टरचे उड्डाण. आयएनएस विक्रमादित्य-विक्रांत पहिल्यांदाच अरबी समुद्रात एकत्र, नौदलाच्या सर्वात मोठ्या सरावात 35 लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि पाणबुड्या. अमृतसरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाकिस्तानी ड्रोन घुसले, सीमेवर फेकले 5 किलो हेरॉइन. भारताला अमेरिका देणार नाटो देशांचे तंत्रज्ञान, पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यामध्ये अनेक करार शक्य. खरीप पिकांच्या हमीभावात वाढ- केंद्र सरकारकडून यंदा भरीव वाढीसह हमीभाव जाहीर करण्यात आले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डने अफू, गांजा, चरसची तस्करी करणाऱ्या सिंडीकेटच्या विरोधामध्ये एक प्रचंड यश मिळवले, ज्या वेळेला हजारो कोटी रुपयांचे ड्रग डार्क नेटमधून तंत्रज्ञानाच्या मदतीने पकडण्यात आले. भारताचे सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी बांगलादेशाची यात्रा केली, ज्यामुळे भारताचे बांगलादेशबरोबरचे संरक्षण आणि सामरिक संबंध अजून मजबूत झाले आहेत. राफेल विमानाने आठ तास उड्डाण करून पॅसिफिक महासागरामध्ये असलेल्या शत्रूच्या टार्गेटवरती हल्ला करण्याची प्रॅक्टिस केली. “अल-निनो’ सक्रिय झाल्यामुळे भारतातील मोसमी पावसावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती. मात्र, देशाच्या जल सुरक्षेवर विशेष लक्ष ठेवावे लागेल. कॅनडातील विवादास्पद चित्ररथ कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तानी समर्थकांनी 5 किमी मोठी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा चित्ररथ चालवण्यात आला. व्हिडिओमध्ये इंदिरा गांधींचा पुतळा दिसतोय. पुतळ्याला रक्ताने माखलेली साडी नेसवलेली आहे. तसेच या पुतळ्यासमोर बंदूक रोखून उभे असलेले शीख हल्लेखोर (जे इंदिरा गांधींचे सुरक्षारक्षक होते) दिसत आहे. या चित्ररथाद्वारे इंदिरा गांधींच्या हत्येचा सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न खलिस्तान समर्थकांनी केला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हा मुद्दा कॅनेडियन सरकारपुढे उपस्थित केला आहे. मणिपूरसाठी शांतता समितीची स्थापना मणिपूरमधील विविध वांशिक गटांमध्ये शांतता प्रक्रियेचे सुलभीकरण करणे आणि परस्परविरोधी पक्षांमध्ये संवादाची सुरुवात करणे, यासाठी केंद्र सरकारने राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या शांतता समितीत मुख्यमंत्री, काही मंत्री, खासदार, निरनिराळ्या राजकीय पक्षांचे नेते आणि नागरी समाज गट यांचा समावेश आहे. ही समिती सामाजिक सुसंगतता व परस्परांबाबतची समजूत बळकट करेल आणि विविध वांशिक गटांमध्ये सौहार्दपूर्ण संवाद सुलभ करेल. या समितीत माजी सनदी अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध वांशिक गटांचे प्रतिनिधी यांचाही समावेश आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नुकतीच मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांची भेट घेतली. सुरक्षा दलांची लुटलेली शस्त्रास्त्रे परत करण्यासाठी आमदार सुसिंद्रो मैतेई यांनी आपल्या निवासस्थानी एक पेटी (ड्रॉप बॉक्स) ठेवण्यात आला आहे. येथे शस्त्रे परत करणाऱ्या व्यक्तीची ओळख उघड केली जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल. पंचेन लामा राजकीय कैदी म्हणून अटक दलाई लामा यांच्यानंतर तिबेटचे दुसरे सर्वोच्च धर्मगुरू 11 वे पंचेन लामा यांची चीनने तत्काळ सुटका करावी आणि मानसरोवर यात्रेवरील शुल्क व बंदी हटवावी, अशी मागणी भारत-तिबेट मैत्री असोसिएशनने केली आहे. दलाई लामा यांनी 14 मे रोजी तिबेटचे अकरावे पंचेन लामा घोषित केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी 17 मे रोजी चीनने त्यांच्या कुटुंबाला राजकीय कैदी म्हणून अटक केली. हायटेक पाणबुड्यांसाठी जर्मनीची निवड भारत आणि जर्मनीमध्ये 6 पाणबुड्यांसाठी सुमारे 43 हजार कोटी रुपयांचा करार होणार आहे. भारत दीर्घकाळापासून आपल्या नौदलासाठी पाणबुड्या घेण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या भारतीय नौदलाकडे 16 पाणबुड्या आहेत. मात्र, यातील 11 खूप जुन्या आहेत. भारताकडे असलेल्या दोन पाणबुड्या अणुशक्तीवर चालणाऱ्या आहेत. पाणबुड्या बांधण्यासाठी भारत आणि जर्मनी यांच्यात झालेल्या करारानुसार 6 आधुनिक डीझेल पाणबुड्या बनवल्या जाणार आहेत. यासाठी जर्मनीची सागरी शस्त्रास्त्र कंपनी आपले तंत्रज्ञान भारताला देणार आहे. या सर्व 6 पाणबुड्या (एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन) एआयपी तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. या तंत्रज्ञानाने बनवलेल्या पाणबुड्या पारंपरिक डीझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांपेक्षा सुरक्षित असतात. कारण त्या बराच काळ समुद्राच्या आत राहू शकतात. भारताने यापूर्वी 1986 ते 1994 या कालावधीत जर्मनीकडून चार शिशुमार श्रेणीच्या पाणबुड्या खरेदी केल्या होत्या. जर्मन तंत्रज्ञान असलेल्या पाणबुड्या भूतकाळातही भारतासाठी भरवशाच्या राहिल्या आहेत, म्हणूनच भारताला नवीन पाणबुड्यांसाठी जर्मनीशी करार करणं गरजेचं आहे.