Dry Day in Maharashtra : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणूक काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने १३ जानेवारी (मंगळवार) ते १६ जानेवारी (शुक्रवार) या कालावधीत संबंधित शहरांमध्ये ‘ड्राय डे‘ (Dry Day) जाहीर केला आहे. नेमका कालावधी काय असेल? प्रचाराची सांगता होताच दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरुवात : मंगळवार, १३ जानेवारी – सायंकाळी ६ वाजल्यापासून. शेवट : शुक्रवार, १६ जानेवारी – मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत/प्रशासकीय सूचनेनुसार. ‘या’ शहरांचा समावेश असणार : राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या हद्दीत हा नियम लागू असेल. यामध्ये प्रामुख्याने खालील शहरांचा समावेश आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे नाशिक आणि नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर प्रशासनाने हा निर्णय का घेतला? निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने ही पावले उचलली आहेत. मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी मद्याचा वापर होऊ नये. मतदानाच्या दिवशी शांतता राखणे आणि दंगल किंवा गोंधळाची शक्यता टाळणे. तसेच निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाने सर्व मद्यविक्रेत्यांना याबाबत पूर्वकल्पना दिली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. निवडणूक काळात पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे.