नगर -अहमदनगर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे आयोजित अंतरजाल उपक्रमात रोज सकाळी अहमदनगर जिल्हा व महाराष्ट्रातील मराठी अध्यापकांसाठी ऑनलाईन झूम ऍपवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हा उपक्रम खूपच उपयुक्त असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे मार्गदर्शन गेले पाहिजे. त्यासाठी माध्यमिक शिक्षकांनी शासकीय शिक्षण संक्रमणाचा वाचन व शैक्षणिक लेखनासाठी उपयोग करावा असा संदेश नाशिक आणि मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी दिला. या उपक्रमाचे कौतुक केले.
अहमदनगर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे आयोजित अंतरजाल उपक्रमात रोज सकाळी अहमदनगर जिल्हा व महाराष्ट्रातील मराठी अध्यापकांसाठी ऑनलाईन झूम ऍपवर मार्गदर्शन केले जाते. यात रोज 100 शिक्षक सहभागी होतात. झालेल्या पाठ्य घटकांचे स्क्रीन रेकॉर्ड करून सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते.
1 जून पासून सुरू झालेल्या या उपक्रमात संतोष पाटील (धुळे), वैशाली अघोर (सोलापूर), सुषमा मानेकर, वैशाली आडमुठे (सांगली), धनराज शेवाळे, सुनिता गोळे (मुंबई) या तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन झाले आहे. लॉकडाऊन आणि उन्हाळी सुट्टीत विद्यालय बंद आहेत. रंगनाथ सुंबे व बाळासाहेब डोंगरे तसेच धनराज शेवाळे, शांताराम मालुंजकर, गोरक्षनाथ शिंदे , सखाराम खेमनर, संगिता सोनटक्के, सुनीता साळे या सर्वांच्या सहकार्याने अंतरजाल उपक्रम सुरू आहे.