अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; जाब विचारायला गेलेल्या बाप- लेकीवर प्राणघातक हल्ला

अहमदनगर : देशात महिलांवरील अत्याचार काही थांबायचे नाव घेईना. रोज कुठेना कुठे एखादी महिला किंवा तरुणी याची शिकार होताना दिसते. अहमदनगर जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या मुलीवर आरोपीवर अतिप्रसंग करण्यात आला. मुलीच्या आवाजानंतर वडील घराबाहेर तत्काळ आल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील जखणगावमध्ये घडली.
काय घडले नेमके?
पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर सहा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. संबंधित अल्पवयीन मुलगी मोटार बंद करण्यासाठी गेली होती. त्याचवेळी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मुलीचा आवाज झाल्याने वडील घराबाहेर आले व पुढील अनर्थ टाळला.
पीडित मुलीचे वडील आल्याचे पाहून अंधाराचा फायदा घेत त्या संबंधित मुलाने तेथून पळ काढला. आरोपी कुठे राहतो हे माहित असल्याने पीडित तरुणी आणि तिचे वडील जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.





