Child Kidnapping Case : लोहगावमध्ये चार वर्षांच्या चिमुरडीला दुचाकीवर बसवून पळविण्याचा प्रयत्न झाला. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच कायदा हातात घेऊन संबंधित तरुणाची मारहाण करणाऱ्या ५ ते ६ अज्ञात व्यक्तींवरही स्वतंत्र गुन्हा नोंदविला आहे. ही घटना १ मार्च रोजी पहाटे पवारवस्ती भागात घडली. ४ वर्षे ९ महिन्यांची चिमुरडी घरासमोर खेळत असताना एक अल्पवयीन मुलगा दुचाकीवरून तेथे आला. त्याने मुलीचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कुटुंबातील एका महिलेने हा प्रकार पाहून आरडाओरडा केला. आवाज ऐकून मुलीची आई तात्काळ बाहेर धावली. Pune Metro : मेट्रो सेवा तब्बल नऊ तास बंद; गैरसोय झाल्यामुळे प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया संशयित मुलीला घेऊन हरणतळे वस्तीच्या दिशेने सुमारे २०० मीटरपर्यंत गेला; मात्र नातेवाईक व स्थानिकांनी पाठलाग करून त्याला पकडले. चिमुरडीची सुरक्षित सुटका केली. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त जमावातील ५ ते ६ अज्ञातांनी संशयितांना मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला व शरीरावर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. Child Kidnapping Case : Varg 2 Jamin : वर्ग-२ च्या जमिनी होणार तत्काळ मालकी हक्काच्या; जुनी अट रद्द झाल्याने नागरिकांना दिलास