ढाका – बांगलादेशातील सुनमगंजच्या शल्ला उपजिल्ह्यातील हिंदू गावात बुधवारी कट्टरवाद्यांनी हल्ला केला. कट्टर इस्लामवादी नेते जुनैद बाबूनागरी समर्थकांच्या मोठ्या जमावाने हा हल्ला केला. बंगबंधू शेख मुजीब यांचा पुतळा उभारण्याला हेफाजात-ए-इस्लाम या इस्लामी संघटनेच्या नेत्याने सोमवारी एका भाषणातून विरोध केला होता. त्याला स्थानिक हिंदू माणसाने फेसबुकवर पोस्ट लिहून टीका केली होती. त्या पोस्टवरून हा जमाव भडकला होता.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला मंगळवारी अटक केली होती. मात्र, तरिही बुधवारी सकाळी जमावाने सूनमगंजमधील गावात घरांवर हल्ला केला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या जमावाने गावातील घरांची तोडफोड केली आणि लूटमारही केली, असे पोलिसांनी सांगितले आहे.
या परिसरात पोलीस आणि शीघ्र कृती दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. या दंगलीदरम्यान ज्या गावकऱ्यांनी पळ काढला होता, ते आता परतत आहेत आणि परिस्थिती पूर्ण नियंत्रणाखाली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी डेफई येथे झालेल्या परिषदेत हेफाजात-ए-इस्लामचे नेते उपस्थित होते. त्या ठिकाणी झालेल्या प्रक्षोभक भाषणांवर स्थानिक हिंदू युवकाने फेसबुकवर आक्षेप व्यक्त केला होत.