दारूसाठी पैसे न दिल्याने ज्येष्ठ नागरिकावर हल्ला

पिंपरी – दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरुन एका ज्येष्ठ नागरिकावर ब्लेडसदृश्‍य वस्तूने वार करुन त्यांना जखमी केले. हा प्रकार गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे घडला. अभिमान बाबूराव घोलप (वय 63, रा. इंद्रानगर, ओटास्कीम, निगडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संतोष कांबळे (रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) याच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी घोलप किराणा माल खरेदी करून आपल्या घराकडे जात असताना त्यांना अडवून दारुसाठी पैसे मागणाऱ्या आरोपीने पैसे न मिळाल्याच्या रागातून त्यांच्यावर वार केले व बोट पिरगळून फॅक्‍चर केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घोलप गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास किराणामाल खरेदी करून घराकडे परतत होते. ते इंद्रानगर येथे आले असता आरोपी संतोष कांबळे याने त्यांना अडविले. कांबळे दारू पिण्यासाठी घोलप यांच्याकडे पैसे मागू लागला. दारु पिण्यासाठी पैसे देणार नसल्याचे घोलप यांनी सांगताच कांबळे संतापला आणि घोलप यांच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी, घोलप यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने घोलप यांच्या डाव्या हाताच्या बोटावर ब्लेडने वार केले व बोट पिरगाळून जखमी केले. या प्रकरणाचा अधिक तपास निगडी पोलीस तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.