Attack on ED : दिल्लीत ‘ईडी’च्या पथकावर हल्ला, एक अधिकारी जखमी…

नवी दिल्ली – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छापे टाकण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे पथक राजधानी दिल्लीत दाखल झाले. जेथे छापा टाकणाऱ्या ईडीच्या पथकावर हल्ला करण्यात आला. सायबर फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात छापे टाकण्यासाठी ईडीची टीम आली होती.
दिल्लीतील बिजवासन भागात घडलेल्या या घटनेबाबत तपास यंत्रणेने पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. हा तपास पीपीपीवायएल सायबर एप फसवणूक प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणातील कथित आरोपींमध्ये अशोक शर्मा आणि त्याच्या भावाचा समावेश आहे.
Reserve Bank of India : भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांचा आकार वाढण्याची गरज – एम राजेश्वर राव
याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. यावेळी ईडी पथकातील तपास अधिकारी जखमी झाले आहेत. हे पथक शोध मोहिमेसाठी गेले होते. स्थानिक पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.





