शिक्रापूर मधील SBIचे ATM मशीन चोरट्यांनी लांबविले

Updated On:

शिक्रापूर –  येथील पाबळ चौक परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत एटीएम सेंटरमध्ये दोन एटीएम मशीन असून रात्री अडीच ते तीनच्या सुमारास स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या चोरट्यांनी एटीएम सेंटर चा दरवाजा तोडून आत मधील दोन्ही एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला.

यावेळी एक एटीएम मशीन चक्क एटीएम सेंटरच्या बाहेर काढून त्यांच्या वाहनात टाकून चोरटे पळून गेले. यावेळी एटीएम मशीन चे अनेक भाग त्याठिकाणी बाहेर रस्त्यावर पडले. घडलेल्या प्रकाराची माहिती आज सकाळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, अमोल खटावकर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, होमगार्ड सागर इंगवले, स्वप्नील खैरे यांसह आदींनी त्याठिकाणी जात पाहणी केली.

यावेळी एटीएमचे अनेक भाग रस्त्यावर पडलेले दिसले तर स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या चोरट्यांनी एक एटीएम मशीन रकमेसह पळून नेले. मात्र बँकेचे कोणी अधिकारी अद्याप उपलब्ध झालेले नसल्याने चोरी गेलेले एटीएम मशीन मध्ये किती रक्कम होती याची माहिती मिळू शकली नाही. आज दिवसभरात बँकेचे अधिकारी त्या ठिकाणी आल्यानंतर चोरी गेलेल्या रकमेबाबत माहिती मिळेल आणि दिवसभरात चित्र पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल.

मात्र भर चौकातून टीएम मशीन चोरी गेल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वी देखील या शाखेतील याच एटीएम सेंटरमधील एटीएम मशीन चोरी झाले होते.  त्यावेळी देखील लाख रुपये चोरीला गेले असताना बँक अधिकारी अद्यापही येथे सुरक्षारक्षक का नेमत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

2026-10-07 11:15:40

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

2026-10-06 13:03:57

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

2026-10-05 12:22:50

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त

2026-10-04 22:20:05

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त

Jairam Ramesh : सत्तेचा अहंकार आत्मघातकी असतो; जयराम रमेश यांची टीका

2026-10-04 16:39:28

Jairam Ramesh : सत्तेचा अहंकार आत्मघातकी असतो; जयराम रमेश यांची टीका