एथरचा धमाका! नववर्षाच्या सुरुवातीलाच लाँच केली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, पाहा डिटेल्स

Ather Energy New Electric Scooters: एथर एनर्जीने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 4 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्सला भारतीय बाजारात लाँच केले आहे. कंपनीने 450 रेंजच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सला नवीन अपडेटसह बाजारात आणले आहे.
कंपनीने नवीन Ather 450S इलेक्ट्रिक स्कूटरला 1.30 लाख सुरुवाती किंमतीत लाँच केले आहे. तर Ather 450X 2.9 व्हेरिएंट 1.47 लाख रुपये किंमतीत (एक्स-शोरूम) उपलब्ध होईल. तर Ather 450X 3.7 ची एक्स-शोरूम किंमत 1.57 लाख रुपये आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. सोबतच किंमतीत देखील वाढ केली आहे.
एथर 450S
कंपनीने जुन्या मॉडेलच्या तुलनेत या स्कूटरच्या किंमतीत 4400 रुपये वाढ केली आहे. यासोबत 375 वॉट फास्ट चार्जर देखील दिला जाईल. यामुळे आता स्कूटर जलद चार्ज होऊ शकेल. तसेच, एथर 450S च्या प्रो पॅकची निवड केल्यास अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. यात अतिरिक्त फीचर्सचा देखील फायदा मिळेल.
एथर 450X
कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरच्या दोन्ही व्हेरिएंटमध्ये मॅजिक ट्विस्ट आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखे फीचर्स मिळणार आहेत. कंपने एथर 450X 2.9 ला दोन नवीन रंगात लाँच केले आहे. मात्र, यासाठी आता 6,400 रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील. यासोबत 700 वॉट फास्ट चार्जर देखील देण्यात आला आहे.
एथर 450X 3.7
एथर 450X 3.7 2025 मॉडेल जुन्या मॉडेलच्या तुलनेत 2 हजार रुपये महाग आहे. हे मॉडेल नवीन रंग आणि फीचर्ससह सादर करण्यात आले आहे. यात लो आणि हाय मॅजिक ट्विस्टचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
एथर 450X 3.7 प्रो
इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत वाढ झाली असली तरीही प्रो पॅक्स आधीच्या किंमतीतच मिळेल. स्कूटरला अतिरिक्त पॅकसह देखील खरेदी करू शकता. 2.9 आणि 3.7 व्हेरिएंटच्या प्रो पॅकसाठी अनुक्रमे 17,000 आणि 20,000 रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील. ही इलेक्ट्रिक स्कूटर हायपर सँड आणि स्टेल्थ ब्लू रंगात येते.


