Atal Pension Yojana : वयाच्या 30व्या वर्षी उघडा खातं; 60 वर्षांनंतर मिळवा दरमहा 5 हजार रुपये पेन्शन!
Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजनेत ५ हजार रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी किती योगदान द्यावे लागते, जाणून घ्या.

Atal Pension Yojana : निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना (APY) उपयुक्त ठरू शकते. या योजनेत वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत हमी पेन्शन मिळते.
३० व्या वर्षी किती पैसे भरावे लागतील? (Atal Pension Yojana)
समजा, तुम्हाला वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ५ हजार रुपये पेन्शन हवी आहे. तर वयाच्या ३०व्या वर्षी खाते उघडल्यास पुढील ३० वर्षे योगदान द्यावे लागेल.
– मासिक हप्ता : ५७७ रुपये
– तीन महिन्यांचा हप्ता : १,७२० रुपये
– सहा महिन्यांचा हप्ता : ३,४०५ रुपये
मासिक हिशेबानुसार ३० वर्षांत एकूण २ लाख ७ हजार ७२० रुपये जमा होतील.
योजनेचे महत्त्वाचे नियम – (Atal Pension Yojana)
या योजनेत १८ ते ४० वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतात. मात्र, १ ऑक्टोबर २०२२ पासून आयकर भरणारे नागरिक नवीन खाते उघडू शकत नाहीत. खातेदाराच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नीला पेन्शन मिळते. दोघांच्या मृत्यूनंतर ५ हजारांच्या पेन्शन पर्यायासाठी ८.५ लाख रुपये वारसाला मिळतात. हप्ता वेळेवर भरणे आवश्यक आहे. विलंब झास ल्याअतिरिक्त शुल्क लागू होते.





