अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर राणादा आणि पाठकबाईंचा पार पडला साखरपुडा

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी साखरपुडा नुकताच पार पडला.
सोशल मीडियावर अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अक्षयाने तिच्या इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये ‘अहा ऽऽऽ’ म्हणजेच तिनं दोघांच्याही नावाची आद्याक्षरं एकत्र कर तिने कॅप्शन दिले आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टवर चाहत्यांसह अनेक मराठी सेलिब्रेटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री ‘अक्षया देवधर’ ने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून पाठक बाई म्हणून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेत अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली. यासोबत या मालिकेत राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्यातील केमिस्ट्री लोकांना फारच आवडली होती.





