Sheetal Mhatre : “मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर…..”; शिंदेसेनेच्या महिला नेत्याचे खळबळ उडवून देणारे ट्वीट, म्हणाल्या ‘ताज का राज’ फुटला तर…
Sheetal Mhatre : अशोक खरात प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून, शिंदेसेनेच्या महिला नेत्याने केलेल्या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे.

Sheetal Mhatre : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यात गाजत आहे. या प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. हादरवणारी माहिती समोर येत असून, खरात प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोपांचे राजकारण सुरू झाले आहे.
अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. अनेक राजकीय नेते त्याच्याकडे सल्ला घेत होते अशी चर्चा आहे. अशातच शिंदेसेनेच्या महिला नेत्याने केलेल्या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे.
क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे…यही तो नही ‘ताज’ का राज? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे. ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल, असे ट्वीट शिंदेसेनेच्या महिला नेत्या शीतल म्हात्रेंनी केले आहे. Sheetal Mhatre
त्यांनी केलेल्या आरोपावर शिवसेना ठाकरे गटाची काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष असणार आहे.
क्रूरकर्मा खरात ला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्री च्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे…
यही तो नही “ताज” का राज ?उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे…
‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल …#खरात_फाइल्स
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 25, 2026
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यावेळी नाशिकमधील दारणा धरणातून अशोक खरात याच्या शिवनिका संस्थेसाठी 39 लाख लिटर पाईप लाईन कामास मंजुरी देण्यात आली होती, ज्याचा जीआर समोर आला आहे. ज्यामुळे आता राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
या संस्थानला पाणी पुरवण्यासाठी धरणापासून 48 किलोमीटर लांब पाईपलाईन टाकण्यात आली होती. हे पाणी पिण्यासाठी आरक्षित दाखवले असले तरी, त्याचा वापर खरातच्या 21 एकरमधील आंब्याच्या बागेसाठी केला जात असल्याचा आरोप आहे. हा प्रस्ताव 25 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजूर झाला होता. त्यावेळी जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री होते.
खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी Sheetal Mhatre
अशोक खरातच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली असून त्याचा वापर कशासाठी करण्यात आला होता, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरातला नाशिक जिल्हा न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा : Andhra Pradesh Bus Tragedy: आंध्र प्रदेशात बस-ट्रकचा भीषण अपघात ; १४ प्रवाशांचा होरपळून मृत्यू





