रहिमतपूर (प्रतिनिधी) – शासन आपल्या दारी या उपक्रमातून कोरेगाव तालुक्यातील नागरिकांच्या प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तारगाव, ता. कोरेगाव येथे तहसील कार्यालय कोरेगाव पुरवठा शाखा व मनोजदादा युवा मंच तारगाव यांच्यावतीने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३५० तक्रारींचा निपटारा करण्यात आला. यावेळी कोरेगावचे तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे , माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब निकम, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर शेटे, अभिजीत घोरपडे,माजी सदस्य दिलीप देशमुख , राजू मोरे उपस्थित होते. डॉ. संगमेश कोडे म्हणाले, सध्या ऑनलाईन प्रणालीमुळे रेशन कार्ड मधील दुरुस्ती होणे सोपे झाले आहे. दारिद्र्यरेषेखालील असणाऱ्या कुटुंबांना रेशन मिळत नाही ते मिळणे गरजेचे आहे. संपूर्ण तालुक्यात संगणकीय प्रणाली सुरू आहे यामुळे आपल्या सर्व समस्या निश्चितपणे सुटतील. यावेळी मनोज घोरपडे म्हणाले, कोरेगाव तालुक्यातील कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी तहसीलदार डॉ संगमेश कोंडे यांनी आजपर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या येणाऱ्या अडचणींना सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. या उपक्रमामुळे या परिसरातील नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होईल. यावेळीसाडेतीनशे लोकांनी आपल्या रेशन कार्ड दुरुस्तीसाठी अर्ज दिले. तसेच उज्वला गॅस योजना व पी एम किसान योजना यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ही अधिकारी उपस्थित होते. प्रशांत निकम यांनी प्रास्ताविक केले. बंडा कणसे यांनी सूत्रसंचालन केले. दुर्गळवाडीचे उपसरपंच महिपती यादव यांनी आभार मानले. उपस्थित होत्या .