अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचे मायभूमीत आगमन; दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत

Shubanshu Shukla | भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि नासाच्या ‘ॲक्झिअम-४’ या यशस्वी अंतराळ मोहिमेचे पायलट शुभांशु शुक्ला मायभूमीत परतले आहे. त्यांचे आज पहाटे अमेरिकेतून भारतात आगमन झाले. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होताच केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले.
शुभांशु शुक्ला यांच्या स्वागतासाठी विमानतळावर ढोल-ताशा वाजवले गेले आणि लोकांनी तिरंगा झेंडा फडकवला. तसेच उपस्थितांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणाही दिल्या. शुभांशु यांच्यासोबत भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेसाठी निवडलेले दुसरे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन प्रशांत बाळकृष्णन नायर हे देखील भारतात परतले.
समोर आलेल्या माहितीनुसार, शुभांशु शुक्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे, त्यानंतर ते आपल्या मूळ गावी लखनऊला रवाना होतील. 22-23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अवकाश दिन समारोहात सहभागी होण्यासाठी ते पुन्हा दिल्लीत परततील. 23 ऑगस्ट रोजी दुसऱ्या राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त ते देशवासीयांशी संवाद साधू शकतात. Shubanshu Shukla |
A moment of pride for India! A moment of glory for #ISRO! A moment of gratitude to the dispensation that facilitated this under the leadership of PM @narendramodi.
India’s Space glory touches the Indian soil… as the iconic son of Mother India, #Gaganyatri Shubhanshu Shukla… pic.twitter.com/0QJsYHpTuS
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) August 16, 2025
संसदेत अवकाश मोहिमेवर विशेष चर्चा
सोमवारी लोकसभेत विकसित भारत-2047 च्या उद्दिष्टांतर्गत अवकाश कार्यक्रमाच्या भूमिकेवर विशेष चर्चा आयोजित केली जाईल. यावेळी शुभांशु शुक्ला यांच्या आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राचा प्रवास, प्रयोगां आणि अवकाश क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर चर्चा होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात शुक्ला यांचा उल्लेख केला होता.
A moment of pride for India! A moment of glory for #ISRO! A moment of gratitude to the dispensation that facilitated this under the leadership of PM @narendramodi.
India’s Space glory touches the Indian soil… as the iconic son of Mother India, #Gaganyatri Shubhanshu Shukla… pic.twitter.com/0QJsYHpTuS
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) August 16, 2025
सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
भारतात परतताना शुक्ला यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले ,“अमेरिकेत मिळालेल्या मित्रांना आणि कुटुंबाला सोडत असल्याचे दु:ख आहे, पण भारतात परतून आपल्या कुटुंबियांना आणि देशवासियांना भेटण्याचा आनंदही आहे. माझ्या कमांडर पेगी व्हिट्सन म्हणतात – अंतराळ प्रवासात बदल हाच स्थायी आहे, आणि जीवनातही हेच सत्य आहे.” सोबत त्यांनी ‘स्वदेस’ चित्रपटातील ‘यूँ ही चला चल राही’ या गीताच्या ओळी लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. Shubanshu Shukla |
हेही वाचा :
जालन्यात पोलिसांचा सिनेस्टाईल हल्ला, बच्चू कडूंचा संताप, पंकजा मुंडेंनाही लगावला टोला





