पिंपरी वाहतूक कार्यालयात सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण

पिंपरी – वाहतूक कार्यालयात मोठमोठ्याने आरडाओरडा करत सहायक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की आणि मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 24) सकाळी हिंजवडी वाहतूक कार्यालयात घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

संतोष शंकर मंजुळकर (वय 41, रा. पाषाणगाव), उदराम डगलाराम घाची (वय 38, रा. बालेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे हे हिंजवडी वाहतूक कार्यालयात कार्यरत आहेत. गुरुवारी सकाळी कर्तव्यावर असताना त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका खाजगी कारवर कारवाई केली.

या कारवाईवर आक्षेप घेत आरोपी हिंजवडी वाहतूक कार्यालयात आले. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तसेच सहायक पोलीस निरीक्षक लोंढे यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की, मारहाण केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.