पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेले सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांची भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. याबाबतचा आदेश सहसचिव सं. श. गोखले यांनी काढला आहे.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे ओढवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे डॉ. आष्टीकर यांची सेवा तात्पुरत्या स्वरुपात 14 ऑगस्ट रोजी कोल्हापूर महापालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे. 16 ऑगस्ट रोजी त्यांची पिंपरी महापालिकेतून भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली. तथापि, कोल्हापूर महापालिकेकडे केलेली सेवा परत केल्यानंतरच आष्टीकर यांनी भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारावे, असे आदेशात स्पष्ट केले आहे.