पुणे – कौटुंबिक न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीशी लढ्यासाठी 1 लाख 56 हजार 424 रुपयांची मदत केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कौटुंबिक न्यायालयाचे प्रभारी प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना करोना संकटाशी सामना करण्यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्री निधीसाठी ऐच्छीक रित्या एक दिवसाचे वेतन देण्यासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला सर्व वर्गातील अधिकारी आणि कर्मचऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन ही रक्कम उच्च न्यायालयाने दिलेल्या बँक खात्यात जमा केला आहे. काही कर्मचाऱ्यांनी संकटाचे गांभिर्य ओळखून एक दिवसाच्या वेतनापेक्षही जास्त निधी दिला. निधी संकलनसाठी कौटुंबिक न्यायालयाचे प्रबंधक केळकर, अधिक्षक वैद्य, महाडिक, रोटिथोर आणि पुरणकर यांनी सहकार्य केले. काही कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने मुख्यमंत्री निधी मध्येही रक्कम जमा केली आहे.