पिंपरी | मित्राच्या अपघातग्रस्त भाचीला ८० हजार रुपयांची मदत

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मित्राच्या अपघातग्रस्त भाचीला अँड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर, तळेगाव दाभाडेच्या इयत्ता १० वीच्या १९९० बॅचकडून ८० हजार रुपयाची आर्थिक मदत करून शालेय मैत्रीच्या जवळकीचे दर्शन घडविले.
सदर रकमेचा धनादेश पंडित सुरेश साखवळकर, अतुल पवार यांचे हस्ते अपघात ग्रस्त प्रियंका कोळी हिचे मामा वर्ग मित्र कैलास गाढ़वे याच्याकडे सुपुर्द केला .या वेळी १९९० बॅचचे सुहास गरूड़ ,संतोष बो-हाडे, ज्योती पटवर्धन, सोमनाथ शेलार, महेंद्र जैन आदी उपस्थित होते .
शाळेतील १९९० च्या १० वीच्या बॅचमधील कैलास गाढ़वे याची भाची प्रियंका कोळी ही ठाणे येथे वास्तव्यास आहे. तीचा २६ एप्रील रोज़ी पायावरून डम्परचे चाक गेल्याने गंभीर अपघात झाला. मित्र कैलास गाढ़वे याने ही माहिती १९९० वर्ग मित्रांच्या व्हाट्सॲप ग्रुप वर १२ मे रोजी टाकली.याची दखल सर्व वर्ग मित्र व मैत्रीनी घेतली.
सर्वानी मिळून प्रियंका हिला आर्थिक मदत करायचा निर्णय घेतला व दोनच दिवसात सर्वांनी ८०, हजार रुपये जमा केले व मित्र कैलास गाढवे यांच्याकडे ते सुपुर्द केले. या वेळी सुरेश साखवळकर यांनी कौतुक केले. प्रस्ताविक सुहास गरुड यांनी केले. आभार संतोष बो-हाडे यांनी मानले.





