विधानसभा मिशन 2019

बापूराव जाधव
सदस्य, जिल्हा  परिषद  सातारा

प्रतिबिंब हे नेहमी निर्मळ पाण्यातच दिसते आणि सत्य हे नेहमीच उच्चशिखरावर असते. आपल्या निर्मळ वाणीने व सत्य विचाराने तालुक्‍याच्या कानाकोपऱ्यातील सर्वांची मने जिंकणारे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर (दादा) यांनी तमाम जनतेच्या मनात प्रचंड क्रेझ निर्माण केली आहे. त्यामुळे 2019 चे मिशन साध्य करण्यासाठी व तालुक्‍याच्या विकासाला खंबीर फलंदाज मिळवून देण्यासाठी तालुक्‍यातील सर्व जनता आसूसली आहे. अशा कर्तृत्ववान युवा नेतृत्वाचा आज वाढदिवस. त्यानिमित्त…

पाटण तालुक्‍यातील खेडोपाड्यातील जनतेसाठी रस्त्यावर उतरणारे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे, युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले युवा नेते म्हणून सत्यजितसिंह पाटणकर (दादा) यांचेकडे पाहिले जाते. सत्यजीतसिंह पाटणकर यांच्या रुपाने पाटण तालुक्‍याला पडलेले हे सोनेरी स्वप्न आहे. तालुक्‍याच्या विकासाचे नवे पर्व घेऊन सोबत अनुभवी कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपली वाटचाल दादांनी सुरू केली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात तालुक्‍याला योग्य दिशेने घेऊन जाणारे आदरणीय माजी सार्वजनीक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहून सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हातात संपूर्ण पाटण तालुक्‍याची जबाबदारी दिलेली आहे. आणि ती यशस्वीपणे पार पाडत आहेत, यात तिळमात्र शंका नाही.

पाटण पंचायत समितीची एक हाती सत्ता घेऊन सत्यजीतसिंह दादांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. या यशामुळे सत्यजितदादांना एक प्रकारची ऊर्जा मिळाली. निर्मल पंचायत समितीबरोबरच निर्मल सभापती म्हणूनही त्यांनी तालुक्‍यात नावलौकिक मिळवला. तीच ऊर्जा घेऊन दादा आता पाटण तालुक्‍यातील गावागावात जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहेत. यातून नव्या व जन्या कार्यकर्त्यांचा समेट घालून देण्यातही दादा यशस्वी ठरले आहेत. कार्यकर्त्यांना पाठबळ देत त्यांनी युवावर्गात चांगलीच क्रेझ निर्माण केली आहे.

पाटण पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीत विरोधकांच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावत उद्‌ध्वस्त केले आहे. सामान्य जनतेला पाठीशी घेऊन दादांची वाटचाल सुरू आहे. युक्ती पेक्षा कृती श्रेष्ठ मानून दादांनी तालुकाभर गावागावात भेटी देत असताना कमी बोलून जादा काम करण्याचा सपाटा लावला आहे. पाटण तालुका हा दुर्गम व डोंगराळ असला तरी दादांच्या माध्यमातून आजमितीस पाटण अर्बन बॅंक, सकस, दूध संघ, इंग्रजी माध्यमांची शाळा या सुविधा जनतेसाठी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. यापुढील काळात सुध्दा पाटण तालुक्‍याला आयडॉल बनवण्यासाठी दादांनी भविष्यात अनेक उद्योगधंदे तालुक्‍यात उभे करावेत, ज्यामुळे तालुक्‍यातील बेरोजगार तरुण वर्गाच्या हातला काम मिळले. यामुळे तालुक्‍यातील युवकाला तालुक्‍यातच रोजगार उपलब्ध होईल. दादांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले आहे. समाजकारणातून राजकारण करणारा एकमेव युवा नेता तालुक्‍यातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

पाटण तालुक्‍यातील सामान्य जनतेने पंचायत समितीच्या माध्यमातून दादांना पुढे जाण्याची संधी दिलेली आहे. तालुक्‍यातील शेतकरी, बेरोजगार युवक यांच्या प्रश्नांसाठी दादांनी नेहमीच रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांच्या आंदोलनात सहभागी घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. महत्त्वपूर्ण अशा व्याघ्र प्रकल्पातील जनतेचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी तसेच त्यांना योग्य न्याय मिळावा. यासाठी दादा जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. त्यांनी युवकांना घेऊन विधायक कामासाठी शड्डू ठोकला आहे. तालुक्‍यातील सर्व विभागात दादांनी कामाचा सपाटा लावल्यामुळे जनतेने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्‍यात पुन्हा दादाच पाहिजेत हे दाखवून दिले आहे. दादांच्या विधायक कामांची छाप तसेच सर्वसामान्यांसाठी त्यांची असलेली धडपड याची दखल घेत वेळोवेळी राज्यातील वरिष्ठ नेत्यांनीही दादांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत त्यांना पाठबळ दिले आहे.

दादांनी तालुक्‍यात काम करत असताना केवळ भाषणबाजी न करता लोकांच्या कामांना प्राधान्य दिले आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या विचारांवर व मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदावरील जबाबदाऱ्या लिलया पेलल्या आहेत. याच कर्तृत्वबाजीवर तालुक्‍यात विकासकामांना उभारी दिलेली आहे. विकासाचा झंझावात कसा असतो तो दादांनी संपूर्ण तालुक्‍यातील जनतेला दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तालुक्‍याला उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठी आता कोणीही रोखू शकणार नाही.

जनता आता आश्‍वासनांना बळी पडणार नाही तर कर्तृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून तालुक्‍यात एक मोठे विकासपर्व निर्माण झाले आहे. त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत सत्यजितसिंह पाटणकर तालुक्‍याला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. तालुक्‍यातील युवक त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने एकत्र येत आहे. तालुक्‍यातील प्रत्येक गावांमधील जनता जागृत होऊन विकासाच्या प्रवाहात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दादांनी शड्डू ठोकल्याने विरोधक सैरभैर झाल्याचे दिसत आहेत. शांत संयमी तसेच आवश्‍यक असेल तिथे आक्रमक बाणा दाखवत दादांनी सुरू केलेली खेळी त्यांना विजय मिळवून देईल, यात शंका नाही. त्यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा…!

संकलन – सूर्यकांत पाटणकर, पाटण

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.