Assembly Election: मेघालय, नागालॅंडमधील प्रचाराच्या तोफा थंडावल्या; सोमवारी मतदान
Updated On:

शिलॉंग – मेघालय आणि नागालॅंड विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार शनिवारी सायंकाळी समाप्त झाला. त्या दोन्ही राज्यांत आता सोमवारी (27 फेब्रुवारी) मतदान होईल.
मेघालय आणि नागालॅंड या दोन्ही राज्यांत विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. मात्र, दोन्ही राज्यांत प्रत्येकी 59 जागांसाठी मतदान होईल. एका उमेदवाराच्या निधनामुळे मेघालयमधील एका जागेवरील निवडणूक लांबणीवर गेली आहे. तर, नागालॅंडमधील एक जागा भाजपने याआधीच बिनविरोध जिंकली.
दोन्ही राज्यांमध्ये बहुरंगी लढती होणार आहेत. त्यामुळे मतदानानंतर जाहीर होणाऱ्या निकालाची सगळ्यांनाच प्रतीक्षा असेल. मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा या तीन राज्यांचा निकाल एकाच दिवशी 2 मार्चला जाहीर होईल. त्रिपुरामध्ये याआधीच मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली.





