Assam Muslim Population| आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी २०४१ पर्यंत आसाम मुस्लीम बहुल राज्य होईल, असा मोठा दावा केला आहे. सध्याची आकडेवारी बघता राज्यात ४० टक्के लोकसंख्या मुस्लीम असून आसाममधील मुस्लीम लोकसंख्या दर १० वर्षांनी जवळपास ३० टक्क्यांनी वाढ आहे, असा हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तसेच राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी खोचक टीका केली आहे. नेमकं काय म्हणाले हिमंता बिस्वा सरमा? शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हणाले की, “२०११ मध्ये आसाममध्ये १.४ कोटी मुस्लिम होते. सध्याची आकडेवारी बघता राज्यात ४० टक्के लोकसंख्या मुस्लीम असून आसाममधील मुस्लीम लोकसंख्या दर १० वर्षांनी जवळपास ३० टक्क्यांनी वाढत आहे. त्यानुसार २०४१ पर्यंत आसाम हे मुस्लीमबहुल राज्य होणार आहे, हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. मुस्लिमांच्या तुलनेत आसाममधील हिंदू समाजाची लोकसंख्या दर १० वर्षांनी १६ टक्क्यांपर्यंत वाढत असून भाजप सरकार मुस्लीम लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहे.” राहुल गांधींवर केली खोचक टीका यावेळी बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. “मुस्लिमांची लोकसंख्या वाढ रोखण्यात काँग्रेस सर्वात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जर राहुल गांधी लोकसंख्या नियंत्रणाचे ब्रँड ॲम्बेसेडर बनले तर यावर नियंत्रण ठेवता येईल कारण समाज फक्त त्यांचेच ऐकतो,” अशी खोचक टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या कार्यकाळात आसामचे आरोग्यमंत्री असताना 2009 मध्ये एक लाख पुरुषांची नसबंदी करण्यात आली होती, असा दावा सरमा यांनी केला. हळूहळू हा कार्यक्रम बंद करण्यात आला. जर आपण ही प्रक्रिया चालू ठेवू शकलो तर आपण बऱ्याच अंशी लोकसंख्या नियंत्रणात यशस्वी होऊ शकतो, असेही त्यांनी म्हंटले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार आकडेवारी समोर पीटीआयच्या म्हणण्यानुसार, २०११ च्या जनगणनेनुसार आसाममध्ये एकूण मुस्लिम लोकसंख्या १.०७ कोटी होती, जी एकूण ३.१२ कोटी रहिवाशांपैकी ३४.२२ टक्के होती. राज्यात १.९२ कोटी हिंदू होते, जे एकूण लोकसंख्येच्या ६१.४७ टक्के होते. हेही वाचा: रशियन सैन्यात काम करणाऱ्या 50 भारतीयांना परतायचंय मायदेशी ; भारत सरकारला केले आवाहन