BJP News : भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
आपल्या या तडकाफडकी निर्णयामागे त्यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला दिला आहे. राजकारणाला अलविदा करतानाच त्यांनी भविष्यात इतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगत सर्व राजकीय चर्चांना (BJP News) पूर्णविराम दिला आहे.

BJP News : आसामच्या राजकीय वर्तुळातून (BJP News) एक मोठी आणि अनपेक्षित बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध आसामी गायक आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सिमंत शेखर यांनी मंगळवारी आपल्या राजकीय कारकिर्दीला अनपेक्षित पूर्णविराम देत पक्षाला रामराम ठोकला आहे.
त्यांनी केवळ भाजपच्या (BJP News) प्राथमिक सदस्यत्वाचा आणि राज्य कार्यकारिणी समितीचाच राजीनामा दिला नाही, तर त्यांच्याकडे असलेले ‘आसाम राज्य चित्रपट वित्त व विकास महामंडळा’चे अध्यक्षपदही तडकाफडकी सोडले आहे. शेखर यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे आसाम भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पक्षासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
आपल्या या तडकाफडकी निर्णयामागे त्यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला दिला आहे. राजकारणाला अलविदा करतानाच त्यांनी भविष्यात इतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगत सर्व राजकीय चर्चांना (BJP News) पूर्णविराम दिला आहे.
सिमंत शेखर यांनी आपला राजीनामा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष भाबेश कलिता यांच्याकडे सुपूर्द केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी राजीनामा दिला असला तरी आसाम सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्यापही अध्यक्ष म्हणून त्यांचेच नाव झळकत आहे.
पक्ष सोडताना कोणताही कटुता न ठेवता त्यांनी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या नेतृत्वाखाली आसामचा विकास असाच निरंतर सुरू राहील असा विश्वासही व्यक्त केला आहे.
१८ मे १९८५ रोजी तिहू येथे जन्मलेल्या सिमंत शेखर यांचा इथवरचा प्रवास अत्यंत रंजक राहिला आहे. दिब्रुगड विद्यापीठातून औषधनिर्माण शास्त्राचे (फार्मास्युटिकल सायन्स) उच्च शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी मनाचा आवाज ऐकत संगीताची वाट निवडली. ‘तोरा दोई’ या त्यांच्या पहिल्याच गाण्याने त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली.
२०१३ मध्ये प्रसिद्ध गायक पापोन यांच्यासोबत ‘कोक स्टुडिओ’च्या मंचावर त्यांनी सादर केलेले ‘झुमर’ गाणे प्रचंड गाजले. संगीत क्षेत्रातील यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत सक्रिय राजकारणाची इनिंग सुरू केली होती.
त्यांच्या याच कार्याची दखल घेत २०२२ मध्ये मुख्यमंत्री सरमा यांनी त्यांच्यावर (BJP News) चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. मात्र, आता त्याच संगीतकाराने अचानक राजकीय सूर विसर्जित केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.






