Satara: झेडपी स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
Satara जिल्हा परिषदेमध्ये दि. २० मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर प्रशासकीय राजवट संपून पदाधिकाऱ्यांकडे कारभाराची सूत्रे गेली. त्यानंतर सभापती व विषय समिती सदस्यांच्या निवडी झाल्या. यानंतर काही दिवसातच स्वीकृत सदस्यांच्या निवडी होण्याची अपेक्षा होती. स्वीकृत सदस्य पदाच्या निवडी दि. ९ मे पूर्वी होण्याची शक्यता गृहित धरुन त्यावेळी हालचालींना वेग आला होता.

Satara: जिल्हा परिषद सदस्य निवडीनंतर स्वीकृत सदस्यांचीही तात्काळ निवड होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. आठ महिने होऊनही या निवडी न झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. अनेक इच्छुकांनी गेल्या कित्येक दिवसांपासून या पदासाठी मोर्चेबांधणी केली असून प्रशासनाकडून ही प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही कधी होणार याचीच उत्सुकता आहे.
जिल्हा परिषदेमध्ये दि. २० मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर प्रशासकीय राजवट संपून पदाधिकाऱ्यांकडे कारभाराची सूत्रे गेली. त्यानंतर सभापती व विषय समिती सदस्यांच्या निवडी झाल्या. यानंतर काही दिवसातच स्वीकृत सदस्यांच्या निवडी होण्याची अपेक्षा होती. स्वीकृत सदस्य पदाच्या निवडी दि. ९ मे पूर्वी होण्याची शक्यता गृहित धरुन त्यावेळी हालचालींना वेग आला होता. मात्र, या निवडी रखडल्या. सहा स्वीकृत सदस्यांची निवडी लवकरच होतील अशी शक्यता गृहित धरुन इच्छुकांनी मात्र जोरदार लाॅबिंग सुरु ठेवत आपणच या पदासाठी दावेदार असल्याचे दाखवून देण्यावर भर दिला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्य नियुक्तीबाबतचे राजपत्र दि. २४ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाले आहे. नवीन तरतुदीनुसार जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के किंवा किमान पाच यापैकी जे अधिक असेल त्या प्रमाणात स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. सातारा जिल्हा परिषदेत सध्या भाजपचे २७, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २०, शिवसेना शिंदे गट १५, काँग्रेस १, अपक्ष १ व स्वाभिमानी शेतकरी संघटना १ असे पक्षीय बलाबल आहे. १९९२ मध्ये ७३ व्या घटना दुरुस्तीनंतर जिल्हा परिषदांमधील स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली जिल्हा परिषदेमध्ये सध्याच्या संख्याबळानुसार भाजपला ३, राष्ट्रवादी काँग्रेसला २ व शिवसेना शिंदे गटाला १ स्वीकृत सदस्य मिळण्याची शक्यता आहे. ही निवड प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी आपल्याला संधी मिळावी या हेतूने अनेकांकडून आपली नावे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, पक्षश्रेष्ठी जुन्या चेहऱ्यांना की नवीन चेहऱ्यांना संधी देणार, हे निवडीवेळीच स्पष्ट होणार आहे. ग्रामविकास विभागाने काही दिवसांपूर्वी याबाबत अधिसूचनाही काढली. मात्र, अद्याप तरी याची कार्यवाही झाली नाही.





