Asim Sarode : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणातील ६५ वर्षीय नराधमाला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टमधून मांडली आहे. (Asim Sarode) या भूमिकेला विरोध करत ठाकरे यांची मागणी बेकादेशीर असून आरोपीला कायद्यानुसारच कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका मांडत वकील असीम सरोदे यांनी बेकादेशीर मागण्या करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. (Asim Sarode) अॅड. सरोदे म्हणाले की, “भोर अत्याचार प्रकरणातील नराधमाला कायद्यानुसार १०० टक्के फाशीची शिक्षा होईल. पण ती होण्याआधी त्याचा चौरंग करा, त्याला हालहाल करून संपवा, अशा बेकायदेशीर मागण्या करणाऱ्या प्रवीण तरडे आणि राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांना पोलिसांनी बोलावून घेऊन समज दिली पाहिजे किंवा अशा लोकांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. (Asim Sarode) कायदा हा एखाद्या घटनेसाठी बनवला गेलेला नसतो तर तो चिरंतन असतो. एखादी घटना घडल्यानंतर तेवढ्या घटनेपुरता कायदा बाजूला ठेवून वागावं आणि नंतर पुन्हा लोकशाहीने वागावं, असं सोयीनुसार करता येत नाही,” असं स्पष्ट मत सरोदे यांनी मांडलं आहे. (Asim Sarode)