#AsiaCup2023 #INDvNEP : डकवर्थ लुईस नियमानुसार #TeamIndia ला मिळवू शकते ‘हे’ लक्ष्य…

Nepal vs India Asia Cup 2023 : पावसामुळे पुन्हा एकदा खेळ थांबवावा लागला आहे. भारताने 2.1 षटकात एकही विकेट न गमावता 17 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा 4 धावा करून आणि शुभमन गिल 12 धावा करून क्रीजवर आहे. नेपाळने 231 धावांचे लक्ष्य दिले आहे.
पल्लेकल येथील भारत-नेपाळ सामनाही पावसामुळे विस्कळीत झाला आहे. भारतीय डावाच्या 2.1 षटकांनंतर मुसळधार पावसामुळे सामना थांबवण्यात आला. संपूर्ण मैदान कव्हर्सने झाकलेले होते. मात्र, आता बाजूकडील कव्हर्स काढण्यात आली आहेत. या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाऊ शकतो.
डकवर्थ लुईस नियमानुसार सामना 45 षटकांचा झाला तर भारताला 220 धावांंचे,40 षटकांचा सामना झाला तर 207 धावांंचे, 35 षटकांचा सामना झाला तर 192 धावांंचे, 30 षटकांचा सामना झाला तर 174 धावांंचे आणि 20 षटकांचा सामना झाला तर 130 धावांंचे लक्ष्य मिळेल. 20 षटकाच्या सामन्यासाठी कट ऑफ वेळ रात्री 10.27 असा आहे.





