अश्विनी वैष्णव यांनी AI कॉम्प्युट पोर्टल केले लॉन्च, डीपसीकपेक्षा 9 पट मोठे; 27 AI लॅबची घोषणा

नवी दिल्ली – एआय अर्थात कृत्रीम बुध्दीमत्तेसाठीचा एआय कोश, एआय कॉम्प्यूट या वेबसाइटचं अनावरण केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत केलं. एआय कोशच्या माध्यमातून विविध डेटा, टूल्स आणि एआय मॉड़ेल्स संगणक तंत्रज्ञांना उपलब्ध होती. एआय कॉम्प्यूट या वेबसाइटवर जीपीयू आणि इतर क्लाऊड सुविधा विद्यार्थी, स्टार्टअप, संशोधक आणि सरकारी विभागांना उपलब्ध होतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या कर्मचार्यांसाठी सरकारी पोर्टलवर एआयचा उपयोग करुन विविध अभ्यासक्रम सुचवण्याच्या सुविधेची सुरुवातही त्यांनी केली.
ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट
इंडिया एआय मिशन आणि सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एआयची स्थापना यासारख्या उपक्रमांमुळे देशाची आर्टिफिशियल इंटेलिजन्स इकोसिस्टम मजबूत होत आहे. हे प्रयत्न विकसित भारत 2047 च्या संकल्पनेशी सुसंगत आहेत. सरकारनं एआय क्षमता बळकट करण्यासाठी 5 वर्षांत 10 हजार 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आयात तंत्रज्ञानावरचं अवलंबित्व कमी करून पुढच्या 3 ते 5 वर्षांत स्वत:चे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स-जीपीयू विकसित करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे.
याअंतर्गत 18 हजार सहाशे 93 जीपीयू बसवण्यात येत आहेत तसचं 5 सेमीकंडक्टर प्लांट निर्माणाधीन आहेत. सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रात नवीन एआय सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याची घोषणा केली असून त्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. भारतजेन हा जगातला पहिला सरकारी अनुदानित मल्टिमोडल एलएलएम उपक्रम गेल्या वर्षी दिल्लीत सुरू करण्यात आला होता.





