अश्विनी चौबे यांनी राहुल गांधींना म्हटले ‘फतिंगा गांधी’ ; नेमका याचा अर्थ काय?

Ashwini Choubey on Rahul Gandhi । देशात सध्या राजकीय नेत्याच्या कामापेक्षा त्यांनी केलेल्या विधानावर जास्त चर्चा होताना दिसून येते. त्यातच आता भाजप नेते अश्विनी कुमार चौबे यांनी राहुल गांधींबद्दल एक विधान केले आहे. ज्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. चौबे यांनी राहुल ‘फतिंगा गांधी’ म्हटले आहे. दरम्यान, सर्वसामान्य लोकांच्या मनात आता हे ‘फतिंगा गांधी’ म्हणजे नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासंदर्भात कुतूहल निर्माण झाले आहे.
अश्विनी चौबे काय म्हणाले? Ashwini Choubey on Rahul Gandhi ।
भाजप नेते अश्विनी चौबे यांनी राहुल गांधींबद्दल बोलताना, “राहुल गांधी हे खरे गांधी नाहीत, ते फक्त ‘फतिंगा गांधी’ आहेत, जे काही काळासाठी उदयास येतात आणि नंतर गायब होतात. महात्मा गांधी हे खरे गांधी होते. ज्यांचा आज संपूर्ण देश आदर करतो.” असे त्यांनी म्हटले.
‘फतिंगा’ चा अर्थ काय आहे? Ashwini Choubey on Rahul Gandhi ।
खरंतर, अश्विनी चौबे यांनी राहुल गांधींची तुलना एका कीटकाशी केली आहे जो काही काळ जन्माला येतो आणि नंतर नाहीसा होतो किंवा नष्ट होतो. फटिंगा म्हणजे एक प्रकारचा उडणारा कीटक. असे कीटक पावसाळ्यात जन्माला येतात आणि विजेच्या बल्ब किंवा आगीकडे आकर्षित होतात, हेच त्यांच्या मृत्यूचे कारण बनते. लोक या कीटकांना वेगवेगळ्या नावांनी ओळखतात, काही जण त्यांना ‘फतिंगा’ म्हणतात, तर काही जण त्यांना पावसाळी कीटक, झुरळे किंवा पतंग म्हणतात.
दरम्यान , भाजप नेते अश्विनी चौबे यांनी राहुल गांधींची तुलना अशाच एका कीटकाशी केली आहे, जो काही काळ बाहेर पडतो आणि नंतर स्वतःच नाहीसा होतो. राहुल यांच्या गांधी आडनावावर ही टिप्पणी करण्यात आली आहे, ज्यामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र सध्या या विधानावर राहुल गांधी किंवा काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.





