Ashwini Bidre Murder Case : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण ! आरोपी अभय कुरुंदकरला फाशी कि जन्मठेप? ; 11 एप्रिलला होणार फैसला

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांमधील पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आले आहे. लिव्ह-इन पार्टनर अश्विनी बिद्रे यांची हत्या करुन त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन विल्हेवाट लावण्यात आले होते. पोलिसांच्या तपासानंतर 9 वर्षांनी कोर्टाने त्याला दोषी ठरवले असून येत्या 11 तारखेला शिक्षा सुनावली जाणार आहे.
तब्बल नऊ वर्षानंतर कुरुंदकर दोषी ठरला आहे आणि आता त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. महाराष्ट्रात गाजलेल्या या प्रकरणात कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खटला पनवेल सत्र न्यायालयात सुरु होता. या प्रकरणात 9 वर्षांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर 9 वर्षांनी दोषी ठरला आहे. त्याला हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास त्याला मदत करणाऱ्या दोघांनाही दोषी ठरवण्याते आले आहे. येत्या 11 एप्रिल रोजी कुरुंदकरसह तिघांना काय शिक्षा सुनावली जाते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 2017 साली कुरुंदकरला राष्ट्रपती पदक मिळाले होते, यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे.





