अश्विन शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा : प्राण्यांची कातडी जप्त 

नवी दिल्ली –  मध्यप्रदेशमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अश्विन शर्मा यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यामध्ये काही मृत प्राण्यांचे अवशेष मिळाले आहेत. आयकर विभागाने पहाटे ३ वाजेदरम्यान अश्विन शर्मा यांच्या घरावर छापा टाकला.

अश्विन शर्मा यांच्या घरातून सांबर, चिंकारा, वाघ, बिबटा, हरीण आणि चितळ यांची कातडी हस्तगत करण्यात आली आहेत. हे सर्वांचा संरक्षित वन्यप्राण्यांमध्ये  समावेश होतो. यासंबंधीची माहितीत वन्यविभागही सक्रिय झाला आहे. यासोबतच अवैध हत्यारेही अश्विनच्या घरात सापडली आहेत. याशिवाय अश्विन शर्मा आणि त्यांचे नातेवाईक प्रतीक जोशी यांच्या घरातून १.४६ कोटी रुपये कॅश सापडली आहे. याआधीही ९ कोटी रुपयांची कॅश प्रतीक जोशी यांच्या घरातून जप्त करण्यात आली होती. माजी ओएसडी प्रविणकुमार कक्कड आणि अश्विन शर्मा यांच्या चांगले संबंध असल्याचे समजत आहेत.

दरम्यान, मुख्ममंत्री कमलनाथ यांच्या माजी ओएसडी प्रविणकुमार कक्कड, कमलनाथ यांचे माजी सल्लागार राजेंद्र मिगलानी, अश्‍विनी शर्मा, तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.