Ashutosh Dixit : एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी स्वीकारला पदभार
ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून काम पाहणाऱ्या एअर मार्शल आशुतोष दीक्षित (Ashutosh Dixit) यांनी बुधवारी व्हाइस चीफ ऑफ एअर स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला. एअर मार्शल नागेश कपूर यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

Ashutosh Dixit : ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून काम पाहणाऱ्या एअर मार्शल आशुतोष दीक्षित (Ashutosh Dixit) यांनी बुधवारी व्हाइस चीफ ऑफ एअर स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला. एअर मार्शल नागेश कपूर यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
एअर मार्शल कपूर हे भारतीय हवाई दलातील चार दशकांच्या सेवेनंतर ३० जून रोजी निवृत्त झाले. व्हाइस चीफ ऑफ एअर स्टाफ म्हणून पदभार स्वीकारताना एअर मार्शल दीक्षित यांना (Ashutosh Dixit) हवाई दलाचे मुख्यालय असलेल्या वायू भवन येथे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या समारंभापूर्वी त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देत सशस्त्र दलांच्या शहीद वीरांना पुष्पचक्र अर्पण केले.
एअर मार्शल दीक्षित यांनी १ मे २०२५ रोजी सीआयएससी पदाचा कार्यभार स्वीकारला होता आणि ३० जून रोजी तो सोपवला. हवाई दलामधील (Ashutosh Dixit) त्यांचा कार्यकाळ महत्त्वपूर्ण योगदानासाठी ओळखला जातो.
यात भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सशस्त्र दलांनी मे २०२५ मध्ये ऑपरेशन सिंदूर राबवले होते.






