भाजपला धक्का देऊन अशोक तंवर काँग्रेसमध्ये का आले? ; वाचा काँग्रेसची यामागची खेळी

Ashok Tanwar । हरियाणा निवडणुकीपूर्वी भाजप नेते अशोक तंवर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते TMSP आणि आम आदमी पार्टीमध्येही राहिले आहेत. २ लोकसभा निवडणुकीत सिरसा येथून कुमारी सेलजा यांना आव्हान होते पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक तंवर यांना विधानसभा निवडणूक लढवायची होती. मात्र भाजपने त्यांना तिकीट दिले नाही. यावरून अशोक तंवर संतप्त झाले. पक्षातील अनेक बड्या नेत्यांची भेट घेऊन त्यांनी तिकीट देण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र ते होऊ शकले नाही.
भाजपला पुन्हा मोठा धक्का Ashok Tanwar ।
अशोक तंवर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तन्वर हे हरियाणातील एक मोठा दलित चेहरा असल्याने त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हे भाजपसाठी मोठे यश मानले जात होते. अशोक तनवाब यांच्या माध्यमातून काँग्रेस दलितविरोधी असल्याचा आरोपही भाजपने केला. मात्र आता काँग्रेसने त्यांचा पक्षात समावेश करून भाजपला पुन्हा मोठा धक्का दिला आहे.
काँग्रेसने दलित मतदारांना दिला संदेश? Ashok Tanwar ।
लोकसभा निवडणुकीत कुमारी सेलजा यांनी अशोक तंवर यांचा २,३८,४९७ मतांनी पराभव केला. एप्रिल 2022 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि ‘आप’मध्ये प्रवेश केला. AAP सोडले आणि जानेवारी 2024 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने आता एकाच दगडात अनेकांवर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपची नजर दलित मतदारांवर होती. तंवर यांचा पक्षात समावेश करून काँग्रेसने दलितांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत दुष्यंत चौटाला यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत युती करून दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. दलित मतदार आपल्यापासून दूर जातील अशी भीती काँग्रेसला होती. कारण ऐन निवडणुकीच्या काळात भाजपने कुमारी सेलजा यांच्या निमित्तानं काँग्रेसवर चौफेर हल्ला चढवला होता. कुमारी सेलजा या दलित असल्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांना योग्य मान मिळत नसल्याचा आरोप भाजप करत आहे.





