Ashok Kharat Case : ज्याच्या एका शब्दावर नाशिकमधील मोठे अधिकारी आणि राजकीय नेते लोटांगण घालत होते, तो भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) आता लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या गंभीर आरोपांखाली अटकेत आहे. अध्यात्म आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाने (Ashok Kharat Case) आपल्या प्रभावशाली ओळखी आणि सत्तेच्या जोरावर बराच काळ सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला, पण आता तो स्वतःच्या कृत्यांच्या जाळ्यात सापडला आहे. प्रकरण काही महिने आधीच उघड होऊ शकले असते, मात्र नाशिक पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांच्या कथित संरक्षणामुळे याला उशीर झाल्याची चर्चा आहे. अनेक बड्या नेत्यांसोबत असलेल्या जवळच्या संबंधांमुळे खरातला अहंकार चढला होता, ज्यामुळे तो सावध झालाच नाही. Ashok Kharat Case मित्र आणि पत्नीच्या सल्ल्याला धुडकावले काही महिन्यांपूर्वी खरातच्या मोबाईलमध्ये स्वतःचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सापडले होते. हे व्हिडिओ पाहून त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याला सावध केले आणि “प्रकरण वाढवू नका, देवाणघेवाण करून मिटवा” असा सल्ला दिला. इतकेच नाही, तर खरातच्या पत्नीनेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याच्या अहंकारात खरातने सर्व सल्ले धुडकावले. “मोठे लोक माझ्या पाठीशी आहेत, मला कोणाची भीती नाही,” अशा प्रकारे त्याने पत्नीलाही सडेतोड सुनावले. पोलिस अधिकारी की खरातचा ‘सेवक’? नाशिक विभागातील एक बडा अधिकारी खरातचा कथित आंधळा भक्त होता. खरातच्या मुलीच्या लग्नात एखाद्या नोकराप्रमाणे राबणाऱ्या या अधिकाऱ्याने खरातचा मोबाईल आपल्या विश्वासू पोलिसांच्या ताब्यात दिला. तांत्रिक विभागाने व्हिडिओ डीकोड केले, तेव्हा त्यातील दृश्ये पाहून पोलिसच हादरले. मात्र, या अधिकाऱ्याने खरातला अटक करण्याऐवजी सामंजस्याने मार्ग काढण्याचा सल्ला दिला. “हे बाहेर आले तर बदनामी होईल, त्यापेक्षा तक्रारदारांवरच खंडणीचा गुन्हा दाखल करू,” असा विचित्र सल्ला दिल्यानंतर खरातने खंडणी मागितली जात असल्याची तक्रार दाखल केली. ही तक्रारच प्रकरणाचा टर्निंग पॉइंट ठरली. काही महिन्यांतच खरातविरोधातच गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून (Ashok Kharat Case) आणि घरातून ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले असून, तब्बल १५० पेक्षा जास्त महिलांचे शोषण झाल्याची चर्चा आहे. एका ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून सुरू झालेल्या या प्रकरणात एसआयटी (विशेष तपास पथक) नेमण्यात आली असून, आयपीएस तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.