Ashok Kharat Case : उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीशी संबंधित एक धक्कादायक आणि संवेदनशील माहिती समोर आली आहे. भोंदूबाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक खरात (Ashok Kharat Case) यांच्याशी अनेक राजकारण्यांचे घनिष्ठ संबंध असल्याचे आता जगजाहीर झाले आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक नेते-मंत्री नियमितपणे खरात यांच्या ठिकाणी भेट देत असल्याचे अनेक फोटो समाज माध्यमांवर (Ashok Kharat Case) वेगाने व्हायरल होत आहेत. अशोक खरात यांच्याकडे ‘दिव्यशक्ती’ असल्याचा आणि प्रत्येकाच्या अडी-अडचणींवर तोटका-उपाय सांगण्याचा दावा ते सातत्याने करत आले आहेत. त्यांच्या संमोहन शक्तीमुळे सुशिक्षित आणि बुद्धिमान लोकही त्यांच्या जाळ्यात अडकल्याचे अनेक उदाहरणे समोर आली आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील एका महिला खासदाराने लोकसभा निवडणुकीच्या काळात खरात यांच्याकडे आपला हात दाखवून भविष्य जाणून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Ashok Kharat Case सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीत यश मिळवण्यासाठी ही महिला नेता (ज्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्या आणि नंतर खासदार झाल्या) भोंदू अशोक खरात यांच्याकडे ‘तोटका’ करण्यासाठी गेल्या होत्या. खरात यांनी त्या महिला नेत्याला आश्वासन दिले होते की, “माझ्याकडे दिव्यशक्ती आहे. ईशान्येश्वर मंदिरात पूजा केल्यानंतर मी धक्कादायक निकाल लावून देतो.” त्यांच्या या बोलण्यावर भाळून त्या महिला नेत्याने खरात यांनी सांगितलेली पूजा केली. खरात यांनी त्या उमेदवाराला पूजा करण्यास भाग पाडल्याचा देखील सूत्रांचा दावा आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा धक्का म्हणजे त्या महिला नेत्याने खरात यांच्या उपस्थितीत केलेल्या पूजेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता विशेष पोलीस पथक अर्थात एसआयटीच्या हाती लागला आहे. हा व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात आल्याने त्या महिला नेत्या आणि खरात यांच्याशी संबंधित चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी सांगितले की, खरात यांच्या कार्यालयात ही महिला नेता आणि त्यांचे कुटुंबीय वारंवार येत असल्याचेही सीसीटीव्ही फुटेज एसआयटीला मिळाले आहे. यापूर्वी नाशिक आणि सिन्नर परिसरातील अनेक निवडणुकांमध्ये उमेदवारांसाठी खरात (Ashok Kharat Case) यांनी अशाच प्रकारच्या पूजा आणि तोटके केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात एसआयटीकडून त्या महिला खासदारांचीही चौकशी होण्याची मोठी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या हा व्हिडिओ आणि संबंधित पुरावे एसआयटीकडे असून, पुढील तपास कसा पुढे जातो याकडे राजकीय वर्तुळात तीव्र उत्सुकता आहे.