Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) यांच्या महिलांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणाने राज्यभर मोठी खळबळ उडवली आहे. प्रकरण समोर आल्यानंतर दररोज नवनवे खुलासे (Ashok Kharat Case) होत असून, नवीन गुन्हे दाखल होत आहेत. आता खरातविरोधात आणखी दोन गुन्हे दाखल झाले असून, त्यामुळे त्याच्याविरुद्ध एकूण १० गुन्हे दाखल झाले आहेत. नव्या दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी एकात ३८ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण करण्याचा आरोप आहे. खरातने तंत्र-मंत्र आणि भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांना आपल्या वासनेची शिकार बनवल्याचे समोर येत आहे. खरातचे कथित कारनामे अशोक खरात याने महिलांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी हॉट रिडींग आणि कोल्ड रिडींग या मानसशास्त्रीय ट्रिक्सचा वापर केल्याचे उघड झाले आहे. हॉट रिडींग : यामध्ये खरातकडे येणाऱ्या भक्तांच्या नातेवाईकांकडून किंवा सोशल मीडियावरून खासगी माहिती गोळा करून, पहिल्या पाच मिनिटांतच समोरच्याला भूतकाळातील अचूक गोष्टी सांगून विश्वास संपादन करायचा. त्यानंतर भविष्य सांगण्याच्या नावाखाली विश्वास जिंकून लैंगिक अत्याचार करायचा. Ashok Kharat Case कोल्ड रिडींग : यात समोरच्या व्यक्तीचे फेस रीडिंग, हावभाव, शारीरिक हालचाल, पेहराव, वय आणि संवाद यावरून अंदाज घेऊन प्रश्न विचारले जायचे. खरातने दोन टीम तयार केल्या होत्या, ज्या भक्तांच्या खासगी माहिती गोळा करायच्या. ३८ वर्षीय महिलेवर अत्याचार नव्या गुन्ह्यात उघड झालेल्या प्रकरणानुसार,पीडित महिलेचे कौटुंबिक वाद होते. संसार सुरळीत चालावा म्हणून तिचा पती तिला खरातकडे घेऊन गेला.खरातने नवरा-बायकोमध्ये भांडण होऊ नये म्हणून काही उपाय सांगितले. यावेळी त्याने पतीला बाहेर थांबण्यास सांगितले आणि पत्नीला ऑफिसमध्ये बोलावले.मन आणि शरीर शुद्धी करण्याच्या बहाण्याने खरातने त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केले. त्याने तब्बल चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार कौटुंबिक समस्या सोडवण्याच्या निमित्ताने घडला. प्रकरणाची सद्यस्थिती नाशिक पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) ने तपास सुरू केला आहे. आतापर्यंत खरातविरुद्ध लैंगिक शोषण, फसवणूक, खंडणी आदी आरोपांसह १० गुन्हे दाखल झाले आहेत. अनेक महिलांनी तक्रारी केल्या असून, खरातने अनेक महिलांना फसवल्याचे पुरावे समोर येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात निष्पक्ष आणि कठोर चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रकरण अद्याप तपासाधीन असून, अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे.