Ashok Kharat Case : महिला, पॉर्न व्हिडिओ, पेन ड्राईव्हनंतर ज्योतिषी खरातचा ‘हा’ कारनामा समोर

स्वतःला स्वयंघोषित कॅप्टन म्हणवणारा ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात (Ashok Kharat Case) याला महिलेवर लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने अटक केली आहे.

Updated On:
Ashok Kharat Case : महिला, पॉर्न व्हिडिओ, पेन ड्राईव्हनंतर ज्योतिषी खरातचा ‘हा’ कारनामा समोर

Ashok Kharat Case : नाशिक जिल्ह्यातील एका गंभीर आणि संवेदनशील प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. स्वतःला स्वयंघोषित कॅप्टन म्हणवणारा ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात (Ashok Kharat Case) याला महिलेवर लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने अटक केली आहे.

एका ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपासादरम्यान खरातच्या (Ashok Kharat Case) ताब्यातून ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ असलेला पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे.

याशिवाय, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याच्या प्रकरणातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अटक आणि प्राथमिक तपास
खरात याने ज्योतिष, अंकशास्त्र आणि ‘कॉस्मोलॉजी’च्या नावाखाली लोकांचा विश्वास संपादन केला होता. विशेषतः बड्या राजकीय नेते, अधिकारी, उद्योगपती आणि सेलिब्रिटींचे भविष्य सांगण्यासाठी तो ओळखला जायचा. पीडित महिलेला त्याने भीती दाखवून, गुंगीचे औषध पाजून अत्याचार केल्याचा आरोप आहे.

Ashok Kharat Case

Ashok Kharat Case

हा प्रकार २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत त्याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात घडला, असे तक्रारीत नमूद आहे. बुधवारी पहाटे नाशिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेत अटक केली. न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

फार्महाऊसवर रात्रीचा छापा
अटकेनंतर तपास अधिक गहन झाला. नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील खरातच्या फार्महाऊसवर रात्री उशिरा छापा टाकला. या झडतीत पोलिसांना एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे सापडले. हे सगळे जप्त करण्यात आले आहे.

याशिवाय, मालमत्तेशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे, दस्तऐवज आणि इतर पुरावे ताब्यात घेण्यात आले आहेत. या शस्त्रांचा उपयोग कशासाठी होत होता, याचा सखोल तपास सुरू आहे. फार्महाऊस हे श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टशी संबंधित असून, खरात त्याचे अध्यक्ष आहेत.

कोट्यवधींची संपत्ती आणि राजकीय कनेक्शन
तपासातून खरातची आर्थिक स्थिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली आहे. यामध्ये

  • नाशिक शहरातील आलिशान बंगला आणि कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालय.
  • पाथर्डी फाटा परिसरात सुमारे ३० एकर जमीन.
  • सिन्नर, ओझर विमानतळ परिसर आणि शिर्डी येथे मोठ्या प्रमाणात जमीन आणि मालमत्ता.

एकूण संपत्तीचे मूल्य सुमारे २०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचते, असा प्राथमिक अंदाज आहे. पूर्वी मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणून कार्यरत असलेल्या खरातने (Ashok Kharat Case) निवृत्तीनंतर ज्योतिष क्षेत्रात प्रवेश केला आणि राजकीय वर्तुळात प्रभाव वाढवला. त्याच्या ट्रस्ट आणि संस्थांशी काही प्रमुख राजकीय व्यक्तींचे संबंध असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ज्यामुळे प्रकरण राजकीय वादात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.

आणखी संबंधित बातम्या

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

2026-10-07 11:15:40

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

2026-10-06 13:03:57

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

2026-10-05 12:22:50

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त

2026-10-04 22:20:05

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त

Mad Sandhu: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला गोळ्या घालून संपवलं; गँगस्टर गोल्डी ढिल्लनने घेतली हत्त्येची जबाबदारी

2026-10-04 14:41:01

Mad Sandhu: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला गोळ्या घालून संपवलं; गँगस्टर गोल्डी ढिल्लनने घेतली हत्त्येची जबाबदारी