Ashok Chavan Resignation : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसपदाचा राजीनामा दिला आहे.यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील राजकीय भूकंप होणार का ? अशी शक्यता निर्माण झाली आहे. अशात आता राजकीय वर्तुळातून देखील याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे असं ट्विट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
आपली ट्विटमध्ये नाना पटोले म्हणतात,”काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे.”
पटोले पुढे म्हणतात,”कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू.”
काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही… pic.twitter.com/7hh2U7nHg2
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 12, 2024
राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण म्हणतात
मी आज माझ्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. ते माध्यमांशी बोलता होते. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का ? असा सवाल विचारला असता चव्हाण म्हणाले,”मी माझ्या सर्व काँग्रेस पदांचा देखील राजीनामा दिला आहे.मी अजून कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. पुढील दोन दिवसात मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेल असं स्पष्ट मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं.तसेच मी कधीही काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गोष्टी चव्हाट्यावर मांडलेल्या नाहीत कालपर्यंत मी पक्षासाठी एकनिष्ठतेने काम केलेलं आहे. असंही चव्हाण यावेळी म्हणाले.
चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात
अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार का, याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. यावर फडणवीस यांनी आगे आगे देखो होता है क्या.. असे सूचक वक्तव्य केले. तसेच “भाजपसोबत अनेक मोठ्या पक्षांचे नेते येऊ इच्छितात. काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. असेही त्यांनी म्हटले.