Rajya Sabha Election 2024 । महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे. निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (5), महाराष्ट्र (6), तेलंगणा (3), उत्तर प्रदेश (10), उत्तराखंड (1), पश्चिम बंगाल (5) ओडिशा (3) आणि राजस्थान (3) या 16 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
अशात आता भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. भाजप पक्षात नुकतेच प्रवेश केलेलं अशोक चव्हाण तर पुण्यातील मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. तर केंद्री मंत्री नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे.