Ashadi Wari : पालखी आगमनामुळे वाहतुकीत बदल ;नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
Ashadi Wari:

गुरुवारी शहर वाहतुकीत मोठे बदल, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते टप्प्याटप्प्याने बंद
Ashadi Wari : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त गुरुवारी (९ जुलै) शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक प्रमुख रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात येतील. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर संबंधित रस्ते पुन्हा वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. भवानी पेठेतील श्री निवडुंगा विठोबा (पालखी विठोबा) मंदिरात मुक्कामी दाखल होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बंद असलेले रस्ते ( कंसात पर्यायी रस्ता)
पहाटे ३ ते रात्री ८ पर्यंत
– बोपखेल फाटा ते विश्रांतवाडी ( धानोरी रस्ता, अंतर्गत रस्ते)
– प्रादेशिक मनोरुग्णालय ते आळंदी रस्ता चौक ( येरवडा कारागृह रस्ता, विमानतळ रस्ता)
– सादलबाबा चौक ते पाटील इस्टेट (पर्णकुटी चौक, मंगलदास चौक, आरटीओ चौक)
-बोपोडी चौक ते चर्च चौक (बोपोडीतील भाऊ पाटील रस्ता, ब्रेमेन चौक, औंध रस्ता)
– पोल्ट्री फार्म चौक, औंध, बालेवाडी मार्ग (रेल्वे पोलीस मुख्यालय, ब्रेमेन चौक)
– पिंपरी-चिंचवडमार्गे शहरात येणारी वाहतूक (भाऊ पाटील रस्ता, ब्रेमेन चौक)
सकाळी ८ ते रात्री ११
– रेंजहिल चौक ते संचेती चौक ( रेंजहिल, सेनापती बापट रस्ता, नळस्टॉप चौक)
– खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल)
– गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक (कुंभारवेस चौक, आरटीओ चौक)
दुपारी १२ ते रात्री ११
– फर्ग्युसन रस्ता ते टिळक रस्ता
– डेक्कन ते कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता
– लक्ष्मी रस्ता ते बेलबाग चौक ते टिळक चौक
– शनिपार चौक ते सेवासदन चौक
– छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गाडगीळ पुतळा चौक
-जिजामाता चौक ते बुधवार चौक
– नेहरू चौक ते सोन्यामारुती चौक
दुपारी २ ते रात्री १२
– लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक ते सेवासदन चौक
– छत्रपती शिवाजी महाराज रस्ता ते जिजामाता चौक, बुधवार चौक ते बेलबाग चौक
– लक्ष्मी रस्ता ते बेलबाग चौक
– देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक
– सोमवार पेठ पोलीस चौकी ते डुल्या मारुती चौक
– रामोशी गेट ते पालखी विठोबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक





