‘पंतप्रधान १ तास देऊ शकत नाहीत का?’ ; सर्वपक्षीय बैठकीला आमंत्रित न केल्यामुळे ओवैसी संतापले

Asaduddin Owaisi on all-party meeting। केंद्र सरकार आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल माहिती दिली जाणार आहे. त्यासोबतच सर्व नेत्यांचे विचार देखील ऐकले जाणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडणार आहे.
दरम्यान, एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी या बैठकीला बोलावले नसल्याने नाराजी दर्शवली आहे. त्यांनी “या बैठकीला आपल्यला आमंत्रित करण्यात आले नव्हते.” असे म्हणाले. यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या प्रकरणाबाबत ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आवाहन केले आहे की या बैठकीत सर्व पक्षांना सहभागी करून घ्यावे.
असदुद्दीन ओवैसी यांनी हे सांगितले Asaduddin Owaisi on all-party meeting।
असदुद्दीन ओवैसी यांनी, पहलगामवर होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीबद्दल त्यांनी काल रात्री किरण रिजिजू यांच्याशी चर्चा केली. रिजिजू म्हणाले की, ज्या पक्षांचे ५ किंवा १० खासदार आहेत त्यांनाच बोलावण्याचा त्यांचा विचार आहे. जेव्हा ओवेसी यांनी विचारले की कमी खासदार असलेल्या पक्षांना का बोलावले जात नाही, तेव्हा रिजिजू म्हणाले की बैठक खूप लांबेल. जेव्हा ओवेसी म्हणाले, “मग आमचे काय?” तर रिजिजू गमतीने म्हणाले की तुमचा आवाज बुलंद आहे” असे सांगितले.
#WATCH | | Hyderabad, Telangana: On the all-party meeting called over #PahalgamTerroristAttack, AIMIM Chief Asaduddin Owaisi says, “The reason for which the all-party meeting is called is of national importance. The Home Minister just called me and asked where I am. He has asked… pic.twitter.com/MnKF9TjiEe
— ANI (@ANI) April 24, 2025
पुढे ओवैसी म्हणाले की, “ही भाजप किंवा कोणत्याही एका पक्षाची बैठक नाही, तर ही सर्वपक्षीय बैठक आहे, ज्याचा उद्देश दहशतवाद आणि त्यांना आश्रय देणाऱ्या देशांविरुद्ध एकजूट आणि मजबूत संदेश देणे आहे. त्यांनी विचारले, “पंतप्रधान मोदी सर्व पक्षांचे म्हणणे ऐकण्यासाठी एक तास जास्त देऊ शकत नाहीत का? तुमच्या स्वतःच्या पक्षालाही स्वतःच्या बळावर बहुमत नाही.” ओवेसी म्हणाले, “एखाद्या पक्षाचे १ खासदार असोत किंवा १००, ते सर्व भारतीय जनतेने निवडून दिलेले असतात आणि इतक्या मोठ्या मुद्द्यावर प्रत्येकाचे म्हणणे ऐकले पाहिजे.”
ओवेसींनी पंतप्रधान मोदींना केली विनंती Asaduddin Owaisi on all-party meeting।
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी, “हा राजकीय मुद्दा नाही तर देशाशी संबंधित एक मोठा मुद्दा आहे. म्हणून प्रत्येक पक्षाचे विचार ऐकले पाहिजेत. पंतप्रधान मोदींना आवाहन करताना ते म्हणाले, “मी पंतप्रधानांना विनंती करतो की त्यांनी ही बैठक खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय बैठक बनवावी. ज्या पक्षांचे खासदार संसदेत आहेत त्या सर्व पक्षांना या बैठकीला बोलावले पाहिजे.” अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
सर्वपक्षीय बैठक का आयोजित केली जाते?
बुधवारी सर्व पक्षांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा केली. जेव्हा देशाच्या सुरक्षेला मोठा धोका असतो, तेव्हा सरकार सर्व राजकीय पक्षांना एकत्र बोलावते आणि चर्चा करते. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर किंवा २०२० मध्ये भारत-चीन तणावादरम्यान असे यापूर्वीही घडले आहे. अशा बैठकांचा उद्देश देशाची एकता दर्शविणे आणि सर्व नेते एकत्र येऊन तोडगा काढण्यासाठी चर्चा करणे हा आहे. यासोबतच, विरोधी पक्षाला सरकारला आपले प्रश्न विचारण्याची आणि संपूर्ण माहिती मिळवण्याची संधी मिळते.





