Balasaheb Thorat : सोमवारी १५ डिसेंबर या दिवशी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान घेतले जाणार असून, १६ जानेवारी दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला आहे. आयोगाचा कारभार ‘रिमोट कंट्रोल’द्वारे चालवला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या आरोपामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. थोरात यांनी मतदान यादीवर भाष्य करत, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी जशीच्या तशी स्वीकारणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हटले आहे. या डिजिटल युगात दुबार नावे स्पष्ट दिसत असतानाही ती वगळली जात नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे. जेव्हा या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या, तेव्हा आता आमच्याकडे अधिकार नाहीत, असे सांगून आयोग हात झटकत आहे, असेही थोरात म्हणाले आहेत. आयोगाचे रोखठोक उत्तर खरंतर निवडणुका जाहीर होताच किंबहुना गेल्या काही निवडणुकांत विरोधक सातत्याने ईव्हीएम मशिन्सवर सवाल करत होते. आता विरोधक मतदार यादीमधील गोंधळ, मतदार यादींमधील दुबार मतदार असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. निवडणूक आयोगाने देखील विरोधकांच्या आरोपांवर रोखठोक उत्तर दिले आहे. या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची भारतीय निवडणूक आयोगाची (ECI) अद्ययावत मतदार यादी वापरली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच निवडणुकीत पारदर्शकता रहावी यासाठी एकाच ठिकाणी ३ ते ५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे धोरणही आयोग राबविणार असल्याचे आयोगाने सांगितले आहे. हेही वाचा : आता वेळ आली! ठाकरे बंधू ‘ती’ मोठी घोषणा करणार: घडामोडींना वेग, निर्णयाकडे लक्ष; नेमकं काय घडतयं?