भिवंडीमधून उमेदवारी जाहीर होताच म्हात्रे पवारांच्या भेटीला; कपिल पाटलांवर सडकून टीका

Suresh Mhatre Vs Kapil Patil| भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार कपिल पाटील यांना याआधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच सुरेश म्हात्रे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. म्हात्रे यांच्या येवई येथील आर के लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीएचे अधिकारी पुढे सरसावले आहेत.
काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरेश म्हात्रे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विरोधी उमेदवार कपिल पाटील यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे. “शरद पवार यांच्याकडून काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर २ तासात कारवाई करण्याचा प्रयत्न झाला. परंतु आम्ही हाय कोर्टातून स्टे घेतलेलं आहे.” Suresh Mhatre Vs Kapil Patil|
पुढे ते म्हणाले, “कपिल पाटील यांच्या कडून कारवाई होईल अशी कल्पना होती. त्यांनी हे सगळं केलं आहे. माझी उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कपिल पाटलांनी हस्तक्षेप करुन खोटे गुन्हे दाखल केलं आहेत. १० वर्षात त्यांना खासदारकी कळली नाही,” असा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.
यावेळी म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने माझी उमेदवारी जाहीर झाल्याने सर्व प्रमुख पक्षांचे आभार व्यक्त केले. आज शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. तसेच मविआने जो विश्वास ठेवला आहे. तो मी सार्थ करुन दाखवेन, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. Suresh Mhatre Vs Kapil Patil|
सुरेश म्हात्रे विरुद्ध कपिल पाटील लढत
सुरेश म्हात्रे यांनी २००९ मध्ये शिवसेनेतून भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. २०१४ मध्ये मनसेकडून भिवंडी लोकसभेची निवडणूक लढली होती, ज्यात कपिल पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. तर २०१९ मध्ये शिवसेना पक्षात असतांनाही भाजपचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांना म्हात्रे यांनी जाहीर विरोध केला होता.
हेही वाचा:
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध ; “५ न्याय आणि २५ हमीं”चं आश्वासन, वाचा सविस्तर





