कोश्यारी पायउतार होताच राष्ट्रवादीने लगावला खोचक टोला,’आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले…’
Updated On:

मुंबई – ‘महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर दिली आहे.
जयंत पाटील पुढे म्हणाले,’नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा करूयात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा- सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो !’असेही म्हटले आहे.





