गाडीतून उतरले अन् पुढे जाताच… जितेंद्र यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Jeetendra Viral Video | बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांचा सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. अलिकडेच संजय खान यांची पत्नी जरीन खान यांचे निधन झाले. त्यानंतर सोमवारी 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत त्यांच्या प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी जितेंद्र देखील उपस्थित राहिले होते.
प्रार्थना सभेला पोहचल्यानंतर जितेंद्र गाडीतून खाली उतरून गेटच्या दिशेने जाते होते. मात्र तेथील एका पायरीला अडखळून ते जोरात जमिनीवर पडतात. तेव्हा त्यांच्या आजूबाजूला असलेले लोक त्यांना उचलण्यासाठी धावून येतात आणि लोकांच्या मदतीने ते पुन्हा उठून उभे राहतात आणि ठीक असल्याचं आश्वासन देतात. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत होत नाही. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
यानंतर प्रार्थना सभेतून बाहेर येतानाचा त्यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ते पापाराझींशी बोलताना दिसत आहेत. तेव्हा पुन्हा एकदा ते मस्करीत पायरीजवळ जाऊन अडखळण्याचं नाटक करतात. हे पाहून पापाराझीसुद्धा हसू लागतात. Jeetendra Viral Video |
दरम्यान, या प्रार्थना सभेला हृतिक रोशन, त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद, मुलगा हृदान, सुझान खान, फरदीन खान, राणी मुखर्जी, मलायका अरोरा, संजय खान, जायेद खान हे पोहोचले होते.
हेही वाचा:
Health Tips: थंडी सुरू होताच घशात दुखतंय? ‘हे’ घरगुती उपाय टॉन्सिल्सची समस्या मुळापासून दूर करतील


