मॉस्को – गेले सुमारे सहा महिने सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धात आरशिया युक्रेन युद्धात तब्बल पाच हजार डॉल्फिनचा मृत्यूतापर्यंत नऊ हजार पेक्षा जास्त सैनिकांचा बळी गेला आहे पण तेवढाच मोठा फटका प्राण्यांनाही बसला असून या युद्धामध्ये आत्तापर्यंत पाच हजार पेक्षा जास्त डॉल्फिनचा मृत्यू झाला आहे या मृत्यूला गोळीबार किंवा बॉम्बस्फोट कारणीभूत नसून पाणबुडीसाठी वापरण्यात येणाऱ्या सोनार उपकरणांमुळे या डॉल्फिनला आपला जीव गमवावा लागला आहे
जीवशास्त्र वैज्ञानिक युवान रुसेव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे माशांचा आणि डॉल्फिनच्या मृत्यूचा हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काळासमुद्र परिसरात तैनात असलेल्या युद्धनौका आणि पाणबुड्या यांच्यामुळे या माशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून त्यांच्या मृत्यूला या युद्धनौका जबाबदार आहेत.
युद्धनौका आणि पाणबुड्यावर सोनार यंत्रणा बसवण्यात आलेली असते आणि त्याच्या चारी बाजूने फ्रिक्वेन्सी निर्माण होत असते त्याच्या माध्यमातून पाणबुडीची आणि जहाजातील रडारवर वस्तू दिसू शकतात पण ज्या फ्रिक्वेन्सीमुळे निर्माण होणाऱ्या तरंगांचा नकारात्मक परिणाम जीव सृष्टीवर होत आहे त्याचा फटका डॉल्फिनला बसला आहे या तरंगांमुळे माशांचे शरीर दिवसेदिवस निष्क्रिय होत असून त्यातून एक दिवस त्यांचा मृत्यू होतो