सासवड – पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरीसह ग्रामीण भागात बुधवारी (दि. 5) तब्बल 30 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात हाय रिस्कमधील 28 तर नव्याने 2 रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यात करोनाबाधितांची संख्या 627 वर पोहोचली आहे, अशी माहिती रुपाली सरनोबत यांनी दिली.
सासवड 6, जेजुरी 12, कुंभारवळ 3, बेलसर 6, जेऊर 3 असे एकूण 30 बाधित बुधवारी आढळून आले आहेत. पुरंदर तालुक्यात करोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढू लागला असल्याने लोकांनी संसर्ग वाढू नये यासाठी स्वयंस्फूर्तीने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.